Crime News | पुणे : पिंपरीतील संत तुकराम नगर येथील एच.ए. ग्राऊंड या मैदानात क्रुरपणे काही जणांनी सहा डुकरांना जाळले. हा धक्कादायक प्रकार (Crime News) उडकीस आल्याने संताप व्यक्त करण्यात जात आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.17) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.

या प्रकरणी वकील प्रज्वल कमलेश दुबे (वय 29, रा.तुकाराम मगर, पिपंरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुनिल गजरे (वय 23), बबन गजरे (वय 19) रामदास गजरे (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुबे कामानिमित्त जात असताना त्यांना काही जण गाडीमधून डुकरांना खाली उतरवताना दिसले. संशय आल्याने फिर्यादी यांनी त्वरीत महापालिका पशुवैद्यकीय विभागाला फोन केला. घटनेची माहिती देत, याबाबत काही परवाना महापालिकेने दिला आहे का? याची विचारणा केली. यावेळी त्वरीत महापालिकेने आरोग्य निरीक्षकाला तेथे पाठवले.
फिर्यादी यांनी दरम्यान काही प्राणी मित्रांना तेथे बोलावले. जवळ जाताना त्यांना एक जिवंत डुक्कर दिसले पुढे काही
अंतरावर सहा डुकारांना जाळून टाकण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य फिर्यादी व प्राणी मित्रांना दिसले. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. तेथील दृश्य पाहता अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pimpari crime : आम्हाला पैसे दे नाहीतर तुला मारीन म्हणत तरुणाला लुटले, पिंपरीतील प्रकार







