Yuzvendra Chahal And Dhanshree Verma News : युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा मागच्या वर्षी घटस्फोट झाला होता. त्या घटस्फोटामुळे दोघेही चांगलेच चर्चेत आले होते. घटस्फोटानंतर धनश्री अनेक चित्रपटांमध्ये आणि रिएलिटी शोमध्ये दिसली. पण आता या दोघांबद्दल एक नवी चर्चा सुरू झाली आहे.

चहल आणि धनश्री पुन्हा एकदा एकत्र दिसू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. घटस्फोटानंतर तब्बल 11 महिन्यांनी ते दोघे एका रिएलिटी शोमध्ये एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे “द 50” या रिएलिटी शोमध्ये सहभागी होऊ शकतात. (Yuzvendra Chahal And Dhanshree Verma News)
चहल आणि धनश्री गेल्या वर्षी मार्चमध्ये कायदेशीररित्या वेगळे झाले. घटस्फोटाबद्दल त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांत बोललं, पण आतापर्यंत ते कधीही एका मंचावर एकत्र दिसले नव्हते. आता मात्र “द 50” या शोमध्ये ते दोघे एकत्र दिसण्याची शक्यता आहे. मात्र शोच्या निर्मात्यांनी अजून स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही.
“द 50” या शोचा प्रीमियर 1 फेब्रुवारीला होणार आहे. रात्री 9 वाजता जिओहॉटस्टारवर आणि त्यानंतर 10.30 वाजता कलर्स चॅनलवर हा शो दाखवला जाईल.
लॉकडाऊनच्या काळात चहल आणि धनश्रीची ओळख झाली होती. 2020 मध्ये त्यांनी लग्न केलं. धनश्री अनेकदा चहलचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्येही दिसायची. पण अचानक 2024 मध्ये दोघं वेगळे झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. अखेर मार्च 2025 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटामागचं नेमकं कारण चहल किंवा धनश्री यांच्यापैकी कुणीही सांगितलेलं नाही. दरम्यान, धनश्रीपासून वेगळं झाल्यानंतर चहल आरजे महवशसोबत दिसू लागला. महवशही अनेकदा चहलचे सामने पाहायला स्टेडियममध्ये गेली होती. दोघं एकत्र फिरतानाही दिसल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना अजूनच हवा मिळाली.
आता मात्र चहल आणि धनश्री पुन्हा एकाच शोमध्ये दिसणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.







