Haryana Election 2024: हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला. विनेश फोगाटने 6015 मतांनी भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे.
काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार जुलाना मतदारसंघाची 15 पैकी 15 फेऱ्यांची मतमोजणी झाली असून यात काँग्रेसची उमेदवार विनेश फोगाटला 64491 मतं मिळाली आहेत. तिच्या मतांची टक्केवारी 46.77 इतकी होती. तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार योगेश कुमार यांना 58728 इतकी मते मिळाली, त्यांच्या मतांची टक्केवारी 42.59 इतकी होती.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर 6 सप्टेंबरला विनेशने ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगाटला तिकीट देण्यात आली.
Congress candidate Vinesh Phogat wins the Julana constituency by a margin of 6015 votes.#HaryanaElections pic.twitter.com/hyxb2S95kQ
— ANI (@ANI) October 8, 2024
तसेच हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत विनेशचा विजय झाल्यावर बजरंग पुनिया याने विनेश फोगटचा फोटो शेअर करून लिहिले, ‘देशाची मुलगी विनेश फोगट हिचे खूप खूप अभिनंदन. ही लढाई फक्त जुलाना जागेसाठी नाही, फक्त 3-4 विरोधी उमेदवारांच्या विरुद्ध नाही किंवा फक्त एखाद्या पार्टीच्या विरोधात नव्हती तर ही लढाई देशातील सर्वात मजबूत शक्तींच्या विरोधात होती. आणि विनेश यात विजयी ठरली.
देश की बेटी विनेश फोगाट को जीत की बहुत बहुत बधाई।
यह लड़ाई सिर्फ़ एक जुलाना सीट की नहीं थी, सिर्फ़ 3-4 और प्रत्याशियों के साथ नहीं थी, सिर्फ़ पार्टियों की लड़ाई नहीं थी।
यह लड़ाई देश की सबसे मज़बूत दमनकारी शक्तियों के ख़िलाफ़ थी। और विनेश इसमें विजेता रही।#VineshPhogat… pic.twitter.com/dGR5m2K2ao
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) October 8, 2024