पुणे : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. या सामन्यात आफ्रिकेचा ११८ धावांनी पराभव झाला आहे. आफ्रिकेने टॉस जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. पावसामुळे ही लढत २९ षटकांची करण्यात आली. इंग्लंडने २०१ धावा केल्या होत्या.
आफ्रिकेचे खेळाडू जेव्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा जणू ते फलंदाजी वसरले की काय असे वाटू लागले. स्कोअरबोर्डवर धावा नव्हे तर फक्त विकेटचे आकडे बदल होते. गोलंदाजांवर तुटून पडणारे आफ्रिकेचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परत होते. आफ्रिकेने फक्त ६ धावा केल्या होत्या आणि त्यांनी ४ विकेट गमावल्या.
आफ्रिकेच्या सलग ३ फलंदाजांना धाव करता आली नाही. यात जानेमन मलान, रस्सी वॅन डेर डूसन, एडेन मार्कराम यांचा समावेश होता. मार्करामतर एकही चेंडू न खेळता जोस बटलरच्या थ्रोवर धावबाद झाला. त्याचा डाव २०.४ षटकात ८३ धावात संपुष्टात आला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आफ्रिकेच्या फक्त ३ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. यात हेन्नरी क्लासेनने ३३, डेव्हिड मिलर १२ तर ड्वेन प्रिटोरियसच्या १७ धावांचा समावेश होता. इंग्लंडकडून आदिल राशिदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. पहिल्या वनडेत आफ्रिकेने ६२ धावांनी विजय मिळवला. पण दुसऱ्या लढती इंग्लंडने दमदार कमबॅक केले.