World Cup 2023 मुंबई : 2023 च्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चौकशीच्या फेऱ्यात आले आहे. (World Cup 2023) दहा शहरांमध्ये ही टूर्नामेंट होत आहे पण अनेक प्रसिद्ध स्टेडियममध्ये सामने न दिल्याबद्दल बोर्डाला टीकेचा सामना करावा लागत आहे. पंजाबचे क्रीडामंत्री गुरमीत सिंग मीत हेयर यांनी मोहालीला दुर्लक्ष केल्याबद्दल बीसीसीआयवर टीका केली आणि हा राजकीय निर्णय असल्याचे म्हटले आहे. (World Cup 2023)
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर यांनीही विश्वचषक इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता येथे सामना न करण्याचा निर्णय का घेण्यात आला, याचे कारण समोर आले आहे.
बीसीसीआयने दिले कारण…
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, स्टेडियम आयसीसीच्या अपेक्षित मानकांची पूर्तता करत नाही. त्यामुळे मोहलीला वगळण्यात आले आहे. मोहालीतील सध्याचे स्टेडियम आयसीसीच्या मानकांची पूर्तता करत नाही आणि म्हणून त्यांना सामने नाकारण्यात आले. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना सामने दिले जाणार नाहीत. काही मालिका त्यांना दिले जाणार आहेत.