Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट लावला उधळून

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 June 2023, 9:54

Pimpri News : पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. माथाडीच्या कामावरून त्यांचे वाद झाले होते. याच वादातून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र खंडणी विरोधी पथकाने दमदार कामगिरी करत हा कट उधळून लावला आहे. मात्र या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. (Pimpri News)

माथाडीच्या कामावरून शेखर ओव्हाळ आणि सराईत गुन्हेगार अमोल गारगले यांच्यात पंधरा दिवसापूर्वी वाद झाले होते. याच वादातून शेखर ओव्हाळ यांची हत्या करण्याचा कट अमोल गारगले, किशोर बापू भोसले आणि अमित दत्तात्रय पाटूळे यांनी रचला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यासाठी तडीपार गुंड रविराज केदार यांच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आणली होती. परंतु, त्याअगोदरच त्यांचा हा डाव हाणून पाडत खंडणी विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे. पैकी पिस्तुल पुरवणारा आरोपी रविराज फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. (Pimpri News) काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात पिंपरी- चिंचवडच्या खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल गारगले हा त्याच्या साथीदारांसह पुनावळे परिसरात माथाडीचं काम करतो.

 

शेखर ओव्हाळ यांची पाच एकर जमीन नुकतीच डेव्हलपमेंटसाठी बिल्डरला देण्यात आली आहे. तिथल्या माथाडीच्या कामावरून शेखर ओव्हाळ आणि अमोल गारगले यांच्यात वाद झाले होते. माथाडीचं हे काम हातातून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला काम मिळणार नाही. या उद्देशाने शेखर ओव्हाळ यांची हत्या करण्याचा प्लॅन अमोल गारगले याने केला. सोलापूर मंगळवेढा येथून तडीपार गुंड रविराज केदारी याच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काढतुसे आणली. (Pimpri News) पुढील दोन – तीन दिवसांमध्ये ओव्हाळ यांची हत्या करण्याचा प्लॅन झाला. त्या अगोदरच खंडणी विरोधी पथकाने संबंधित आरोपींच्या मुस्क्या आवळत हत्येचा कट उधळून लावला आहे.

काही वर्षांपूर्वी पुनावळे परिसरात माथाडीचं काम देशमुख नावाचा व्यक्ती करत होता. त्या व्यक्तीला फायरिंग करून आरोपी यांनी पळून लावलं होतं.(Pimpri News)  तेव्हापासून त्या परिसरातील माथाडीचं काम आरोपीना मिळालं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा माथाडीचं काम हातातून जाईल म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला होता. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

खंडणी विरोधी पथकाची दमदार कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, अशोक दुधवणे, अमर राऊत, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस यांच्या टीमने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : कंपनीचे बनावट नियुक्तीपत्र देत सतरा जणांना 24 लाखांचा गंडा

Pimpri News : जास्त पैसे मिळवण्याचा मोह पडला महागात; प्रीपेड टास्कच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 39 लाखाचा गंडा

Pimpri News : किशोर आवारेंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आलेल्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात; ४ पिस्तुले जप्त

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

World Cup 2023 : मोहालीत सामना न होण्याचे कारण आलं समोर ; BCCI ने सांगितलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.