World Cup 2023 Final : नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत आज एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. भारताने उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारताने आत्तापर्यंत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तगडे संघ आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता भारतीय सघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थीत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उप पंतप्रधान येणार आहेत. त्याशिवाय अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकार रजनीकांत, अमिताभ बच्चन, रंजक सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये येणार आहेत. त्याशिवाय क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडूंती देखील उपस्थीती राहणार आहे.
2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग 11 ची यादी पाहूयात.
भारतीय संघातील खेळाडू : रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यूसी), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू : पॅट कमिन्स (क), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (डब्ल्यूसी), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड