पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (७ ऑगस्ट) फ्लोरिडा येथील लॉडरहिल येथे झाला. भारताने या सामन्यात वेस्ट इंडीजचा ८८ धावांनी पराभव करून ४-१ अशा फरकाने मालिका आपल्या खिश्यात घातली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद १८८ धावा केल्या आणि त्यानंतर १५.४ षटकांत वेस्ट इंडिजला १०० धावांत गुंडाळले. भारताने विजयासाठी दिलेले १८९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विडींजची सरुवात वाईट झाली. अक्षर पटेलने झटपट त्यांचे पहिले तीन गडी बाद केले. पाचव्या षटकाच्या अखेरीस ३३ धावांत तीन गडी बाद झाले होते. शिमरॉन हेटमायरने ३५ चेंडूत ५६ धावा करून कसाबसा डाव सावरला.
बीसीसीआयचे ट्वीट पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
T20I Series In The Bag ???? ????
Smiles All Around ???? ????#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/GsDf1x8J6I
— BCCI (@BCCI) August 7, 2022
टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या ४ अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आणि इशान किशन, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि श्रेयस प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले. कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८८ धावा केल्या होत्या. संघाकडून श्रेयस अय्यरने ६४ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडा ३८, संजू सॅमसन १५, दिनेश कार्तिक १२, इशान किशन ११, कर्णधार हार्दिक पंड्याने २८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने तीन तर जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान, १८८ धावांचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शामर ब्रूक्सने १३ धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने २.४ षटकात १६ धावा देत ४ बळी घेतले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.