विशाल कदम
(Wheelchair Cricket) लोणी काळभोर : पुण्यात पहिल्यांदाच व्हीलचेअर क्रिकेट सराव सुरु झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची टीम तयार होणार असून आपल्याला लवकरच देशपातळीवर क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
पुण्यातील काही दिव्यांग तरुणांनी व्हॉट्स अँप ग्रुप च्या माध्यमातून अनेक दिव्यांग ग्रुपवर संदेश पाठविला. या संदेश मध्ये असे लिहिले होते कि, जे खेळाडू व्हीलचेअर क्रिकेट खेळण्यासाठी इच्छुक आहे. त्यांनी खेळाडूंनी संपर्क करावा. असे सांगण्यात आले होते. या संदेशाला पुणे, चाकण व नाशिक येथील मिळून असे एकूण १५ खेळाडूंनी प्रतिसाद दिला.
त्यानंतर पुण्यातील वानवडी येथील जांभूळकर चौकाजवळील क्रिकेट क्लब मध्ये हि सराव जानेवारी महिन्यात सुरु झाली. तर दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षक नरेंद्र देडगे हे प्रशिक्षण देत आहेत.
दरम्यान, ही एका जिद्धीची गोष्ट आहे. यामध्ये खुप सारे दिव्यांग बंधू वेग वेगळ्या विचारातून व परिस्थितीतुन एकत्र आले आहे. आणी या जिद्दीचा उगम झाला आहे.
या खेळातील खेळाडूंची आवड पाहून त्यांचे करिअर दिसत आहे. या सर्व खेळाडूंना देशासाठी खेळण्याची प्रबळ इच्छा आहे.
याबाबत बोलताना फुरसुंगी (ता. हवेली) येथील ओंकार रवंदाळे म्हणाले कि, हा खेळ दिव्यंगासाठी आहे. त्यामुळे हा खेळ कुणी पाहत नाही. आमची अशी इच्छा आहे की, या कडे सुद्धा नागरिकांनी तेवढ्याच आपुलकी व आदराने बघितले पाहिजे. जेवढे आपण सामान्य क्रिकेट कडे पाहतो. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे.
इच्छुक खेळाडूंना संधी…!
आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवस क्रिकेट खेळण्याचा सराव केला जातो. सध्या १२ खेळाडू सराव करीत आहे. संघात अजून खेळाडूंची आवशक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी जे इच्छुक खेळाडू आहेत. त्यांनी ८३०८९३९६९९ या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन ओंकार रवंदाळे यांनी केले आहे.
समाजातील नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा …
व्हीलचेअर क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडू हे दिव्यांग आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून ते कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून आहेत. हा खेळ खेळताना सर्व खेळाडूंना व्हीलचेअरची गरज आहे. एका व्हीलचेअरची किंमत सध्या ४० ते ४५ हजार रुपये आहे.
सर्व खेळाडूंनी मिळून सध्या ३ व्हीलचेअर घेतल्या आहेत. अजूनही व्हीलचेअरची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशुरांनी पुढे येऊन मदत करावी. अशी विनंती पुणे येथील महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Passport : पुणेकरांचा त्रास वाचणार ; पासपोर्टसाठी दैनंदिन अपॉइंटमेंटमध्ये वाढ!