पुणे : भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. भारताने रंगतदार लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी आणि दोन चेंडू राखून पराभव करत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पाकिस्तानने भारताला १४८ रन्सचं लक्ष्य दिलं होतं, जे भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकलं. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने शेवटी सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
भारताने पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले हात खोलण्याची संधी दिली नाही. विशेष करून हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात शॉर्ट बॉल स्ट्रॅटजी योग्य प्रकारे वापरली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ तर हार्दिक पांड्याने ३ विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४३ धावा केल्या. हा विजय टीम इंडियासाठी सोपा नव्हता, कारण सामना शेवटपर्यंत अडकला होता. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी २१ रन्सची गरज होती. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा क्रीजवर होते. टीम इंडियाच्या सर्व आशा इथेच पक्की झाल्या होत्या आणि या २ ओव्हरमध्ये ते आश्चर्यकारक होतं.
शेवटच्या षटकातील थरार…!
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूत ७ धावांची आवश्यकता होती. डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजच्या हाती चेंडू होता. पहिल्या चेंडूवर रवींद्र जाडेजा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बोल्ड झाला. त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या दिनेश कार्तिकने चेंडूवर एक धाव निघाली. चार चेंडूत विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. हार्दिकने पुढचा चेंडू निर्धाव खेळून काढला. ३ चेंडूत विजयासाठी ६ धावा हव्या होत्या. थोडी टेन्शनची स्थिती होती. दिनेश कार्तिकने हार्दिककडे बघितलं, त्यावेळी हार्दिकने नजरेनेच त्याला निर्धास्त रहाण्याचा इशारा केला. हार्दिकचा त्या कॉन्फिडन्स मधूनच सर्व काही समजून गेलं. त्यानंतर मोहम्मद नवाजच्या पुढच्याच चेंडूवर हार्दिकने थेट षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅच दरम्यान नजरेतूनच हार्दिकने जो आत्मविश्वास दाखवला,