नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 उपांत्य फेरीत इतिहास रचला आहे. विराट एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 20 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला.
या विश्वचषक २०२३ मध्ये विराट कोहलीने ६७४ धावा पूर्ण करून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या, हा विश्वविक्रम होता, मात्र आता हा विश्वविक्रम विराटच्या नावावर झाला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे, ज्याने २००७ विश्वचषकात ६५९ धावा केल्या होत्या, तर रोहित शर्मा ६४८ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. रोहितने 2019 मध्ये हा पराक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 2019 विश्वचषक स्पर्धेत 647 धावा केल्या होत्या.
तसेच कोणत्याही एका विश्वचषकात सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू बनला आहे . चालू विश्वचषकात त्याने 8व्यांदा 50 प्लस धावा केल्या. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन यांनी प्रत्येकी 7 वेळा 50 प्लस धावा केल्या होत्या.
रोहित आणि गिलची धमाकेदार सुरुवात
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 50 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये भारतीय कर्णधाराने 29 चेंडूत 47 धावांची भागीदारी केली. टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो केन विल्यमसनकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत चार षटकार आणि तब्बल चौकार मारले. गिलने 13व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या लागोपाठ चेंडूंवर चौकार आणि षटकार खेचून संघाचे धावांचे शतक पूर्ण केले. पुढच्या षटकात रचिन रवींद्रविरुद्ध एक धाव घेत त्याने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने 59 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.