मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला होता. निवृत्तीला एक महिनाही उलटलेला नाही तोच त्याने वादग्रस्त विधान केले आहे. एल्गरने 2015 च्या भारत दौऱ्याशी संबंधित धक्कादायक खुलासा केला आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्यावर थुंकल्याचा दावा त्याने केला आहे. एल्गारच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ 2015 मध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. पहिली कसोटी मोहालीत खेळली गेली. भारताने हा सामना 108 धावांनी जिंकला होता. भारताने मालिका 3-0 अशी जिंकली. पहिल्या कसोटीदरम्यान कोहलीने आपल्यावर थुंकल्याचा दावा एल्गरने केला आहे. कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर कोहलीची ही पहिलीच कसोटी मालिका होती. एल्गरने असेही सांगितले की, त्याने कोहलीला धमकी दिली होती की, पुन्हा असे केल्यास तो त्याला बॅटने मारेल.
एल्गर काय म्हणाला?
एल्गरने यूट्यूब चॅनलवरील एका संभाषणात सांगितले की, “त्या मालिकेदरम्यान खेळपट्टीवर विनोद केले जात होते. रविचंद्रन अश्विनविरुद्ध फलंदाजी करताना मला लय कायम ठेवायची होती. त्यावेळी रवींद्र जडेजा आणि कोहली माझ्यावर थुंकले. मी त्याला सांगितले की, जर तू पुन्हा असे केलेस तर मी तुला बॅटने मारीन.” असे म्हटल्याचा दावा एल्गरने केला आहे.
विराट कोहलीने माझी माफी मागितली होती. 2017-18 मध्ये भारत जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा कोहलीने ड्रिंक्स दरम्यान केलेल्या वागणुकीबद्दल त्याची माफी मागितली होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर म्हणाला, “दोन-तीन वर्षानंतर विराट कोहलीने मला ड्रिंक्ससाठी आमंत्रित केले होते. कसोटी मालिकेनंतर ड्रिंक्ससंदर्भात त्याने विचारले होते. मला माझ्या कृतीबद्दल माफी मागायची आहे. त्यावेळी आम्ही पहाटे तीनपर्यंत ड्रिंक केली. हा तो काळ होता जेव्हा तो दारू प्यायचा. विराट कोहली त्यावेळी ड्रिंक करत होता. असा दावा देखील एल्गरने केला आहे.
View this post on Instagram