नवी दिल्ली : आज (ता. २७) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने आशियातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना खेळवला जाणार आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने असतील.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी कौतुक केले आहे.’आम्हाला माहित आहे की तो एक अतिशय धोकादायक खेळाडू आहे, सध्या तो काही खराब फार्म मध्ये आहे, पण आम्ही त्याला हलके घेऊ शकत नाही. हे एका मोठ्या खेळाडूचे लक्षण आहे. एक प्रशिक्षक या नात्याने समोरची व्यक्ती कोणत्या मानसिकतेत आहे हे तुम्ही पाहत आहात,’असे सकलेन मुश्ताक म्हणाले.
सकलेनने कबूल केले की विराट वाईट परिस्थितीतून जात आहे, परंतु त्याला हलके घेतले जाऊ शकत नाही. विराट संधीच्या शोधात असेल आणि त्याने 10, 12 आणि 15 वर्षे संपूर्ण जगावर राज्य केले आहे, असेही ते म्हणाले.
सकलेन म्हणाले, “तो ज्या प्रकारचा खेळाडू आहे, त्याने 10, 12, 15 वर्षे राज्य केले आहे, त्याने जगभर जाऊन स्वतःला सिद्ध केले आहे. तो संधीच्या शोधात असेल. त्याच्याबरोबर सर्व सिद्धी असतील. त्याचे कौशल्य त्याच्या शरीरात, त्याच्या व्यवस्थेत आहे फक्त त्याला बाहेर काढण्यासाठी उशीर झाला आहे,”