Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या तयारीत ? ठाकरेंना अद्याप परवानगी नाही

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 August 2022, 11:28
मुंबई : शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू आहे. याआधी शिंदे गटानं प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिंदे गट दसरा मेळाव्यासाठीही प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
शिंदे गटानं शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना पक्षावर दावा ठोकला होता, निवडणूक आयोगाकडे अर्ज करत शिंदे गटानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं, यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर शिवसेनेनंही निवडणूक आयोगाकडे प्रतियाचिका दाखल केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात होतो. यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे दिसत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान  मिळावं म्हणून शिंदे गटही सक्रिय झाला आहे. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच  शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत.
शिवाजी पार्क मैदान मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शन भाषण करणार का? याबाबत उत्सुकता लागली गेली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अजून मुंबई महापालिकेची परवानगी मिळालेली नाही, त्यामुळं आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटानं शिवसेनेच्या पक्षचिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू आहे.
शिवसेनेनं दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे, मुंबई महापालिकेकडून वर्षभरात काही ठराविक कार्यक्रमांनाच परवानगी देण्यात येत असते, त्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचाही समावेश आहे, परंतु अद्यापही महापालिकेनं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याची माहिती समोर आलेली नाही.
शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

माण तहसिलदारावरील निलंबनाने वाळू माफिया 'पेढेवाला' अनेकांच्या भेटीला..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.