पुणे : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेला. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी (DLS Method) पराभव करत भारताने ३-० ने मालिका खिशात घातली. शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे शुभमन गिलच्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. गिलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही मोठी खेळी होती. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत ९१ धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या नाबाद ९८ धावांच्या जोरावर भारताने ३६ षटकांत २५७ धावा केल्या.
शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलच्या साथीने धवनने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी मिळून ११३ धावांची भागीदारी केली. धवनला बाद करून भारताला पहिला धक्का वॉल्शने दिला. धवन वैयक्तिक ५८ धावा करून बाद झाला. यानंतर पावसामुळे दोन तास खेळ खोळंबला. पाऊस थांबल्यानंतर भारताने श्रेयस अय्यर (४४) आणि सूर्यकुमार यादव (८) यांच्या रूपाने आणखी दोन विकेट गमावल्या. दुसऱ्यांदा पाऊस थांबला तेव्हा गिल ९८ धावांवर परतला, भारतीय डाव पावसाच्या पावसात संपुष्टात आला आणि विंडीजला २५७ धावांचे लक्ष्य दिले.
वेस्ट इंडिजला पावसामुळे DLS Method नुसार ३६ षटकांत विजयासाठी २५७ धावांचे लक्ष्य मिळाले. धावसंख्येचा पाठलाग करताना संपूर्ण संघ १३७ धावांत गारद झाला. विंडीजकडून निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी ४२-४२ रन्सची खेळी केली. भारताकडून युझवेंद्र चहलने ४, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने २ तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने १ -१ विकेट्स घेतल्या.