Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs HK Asia Cup 2022 : टीम इंडियाची आज हाँगकाँगशी लढत, टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 31 August 2022, 17:28

पुणे : भारताने आशिया कपची शानदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरोधातील विजयानंतर आज भारताची हाँगकाँग विरोधात लढत होणार आहे. भारत संघ हाँगकाँग संघाच्या तुलनेत सरस असून आजच्या सामन्यात भारताचा विजय निश्चित आहे, असे म्हटले जात आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. याच कारणामुळे भारत आपली विजयी वाटचाल कायम राखणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पाकिस्तानला हरवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. हाँगकाँग सारख्या तुलनेने दुबळ्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळताना टीम इंडिया फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करु शकते. केएल राहुल सारख्या फलंदाजाला फॉर्म मध्ये परतण्याची चांगली संधी आहे. रोहित शर्माच्या टीमसाठी हाँगकाँग विरुद्धचा सामना नेट प्रॅक्टिस पेक्षा जास्त काही नसेल. हाँगकाँगच्या संघात भारतीय आणि पाकिस्तान वंशाचे खेळाडू आहेत. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला सुपर ४ मध्ये प्रवेश मिळू शकतो.

दरम्यान, पाकिस्तानविरोधातील सामन्यात शून्यावर बाद झालेल्या केएल राहुलला वगळून ऋषभ पंतला संधी दिली जाते का हे पाहावे लागेल. तसेच भारताकडे दीपक हुडा हादेखील धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यालादेखील संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. मागील सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहल खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर आर. आश्विन या अष्टपैलुला रोहित संधी देऊ शकतो.

 

भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग ११ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, आवेश खान, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

हाँगकाँग संघाचे संभाव्य प्लेइंग ११ :

निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, यास्मिन मोर्तझा, किनचित शाह, स्कॉट मॅकेनी (यष्टीरक्षक), हारून अर्शद, एजाज खान, झिशान अली, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर

सामन्याची वेळ :

सायं. ७.३० वा. स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी तसेच disney plus hotstar वरदेखील हा सामना पाहता येईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बाप्पासमोर झाला नतमस्तक, भारतीयांना दिल्या अशाप्रकारे शुभेच्छा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.