पुणे : भारत व न्यूझीलंड यांच्यात प्रत्येकी ३ सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिका होणार आहे. यासाठी भारतीय संघाची शुक्रवारी मध्यरात्री घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार आहे. या मालिकेसाठी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्याला जबाबदारी देण्यात आली आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक
टी-२० संघाचा कर्णधार पुन्हा हार्दिक ; त्रिशतकवीर पृथ्वी शॉला संधी
वनडे संघाचे नेतृत्व रोहितकडे दिले असताना टी-२०चे नेतृत्व मात्र हार्दिकडे ठेवण्यात आले आहे. रोहित शर्मा हा संघाचा तिनही फॉर्मेटमधील कर्णधार असताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिककडे जबाबदारी देण्यात आली. आता सलग दुसऱ्या मालिकेत रोहितला बाजूला करून हार्दिककडे नेतृत्व देण्यात आले आहे. टी-२०चे उपकर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे दिले आहे.
दरम्यान, रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचा अखेर संघात समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी केल्या दोन वर्षापासून संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता. त्याच बरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा टी-२० संघातून बाहेर बसवण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन,ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपर हुड्डा, राहुल त्रिपाठी, जिनेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश शर्मा या दोन्ही मालिकेसाठी केएल राहुल आणि अक्षर पटेल हे कौटुंबिक कारणामुळे उपलब्ध असणार नाहीत अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
असा आहे भारत-न्यूझीलंड मालिकेचा कार्यक्रम
वनडे मालिका
पहिली मॅच- १८ जानेवारी, हैदराबाद
दुसरी मॅच- २१ जानेवारी, रायपूर
तिसरी मॅच- २४ जानेवारी, इंदूर
टी-२० मालिका
पहिली मॅच- २७ जानेवारी, रांची
दुसरी मॅच- २९ जानेवारी, लखनौ
तिसरी मॅच- ०१ फेब्रुवारी, अहमदाबाद