Stampede During Football Match : वृत्तसंस्था : क्रिडा क्षेत्रातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. साल्वाडोर फुटबॉल लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जण ठार आणि 500 हून अधिक लोक जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Stampede During Football Match) या घटनेनंतर क्रिडाक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कस्कॅटलानमधील स्मारक स्टेडियममध्ये क्लब अलियान्झा आणि एफएएस यांच्यातील सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. (Sports world shook! Stadium stampede during football match, nine dead)
कस्कॅटलानमधील स्मारक स्टेडियममध्ये हा प्रकार घडला
अलियान्झा आणि एफएएस यांच्यातील सामन्या दरम्यान लोकांनी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वादावादी झाली. यातून गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. (Stampede During Football Match) कस्कॅटलानमधील स्मारक हे स्टेडियम राजधानीच्या ईशान्येस अंदाजे २५ मैल (४१ किमी) अंतरावर आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी किमान दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, फुटबॉल सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी ही दुर्घटना घडली, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. (Stampede During Football Match)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :