मुंबई: श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघाने भारताविरोधात आपल्या संघामध्ये एक बदल केलाय. धनंजय डिसल्वा याला या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. तसेच भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या सामन्यातील विजयी संघ कायम उतरवण्यात आला आहे.
भारतीय संघाची प्लेईंग 11 –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
श्रीलंका संघाची प्लेईंग 11 –
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा, दुशान हेमंता आणि दुष्मंता चमीरा