Sports News : टीम इंडियाची नवी जर्सी लाँच झाली आहे. स्पोर्ट्स ब्रँड आदिदास टीम इंडियाचा नवीन किट प्रायोजक आहे. कंपनीने स्वत: व्हिडिओ जारी करून तीनही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या डिझाईनच्या जर्सी जारी केल्या. 7 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC) टीम इंडिया या जर्सीमध्ये दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण गुरुवारी आदिदासने केले. आदिदासच्या नव्या जर्सी लाँचचा कार्यक्रम मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमयवर करण्यात आला. आता या जर्सीत भारतीय खेळाडू मैदानात दिसणार आहेत. (Unveiling of Team India’s New ‘Jersey’; Different designs for all three formats)
तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या डिझाइन्स
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या फायनलला फक्त एक आठवडा बाकी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर आमनेसामने येणार आहेत. आता टीम इंडियाचे सर्व खेळाडू इंग्लंडला पोहोचले असून (Sports News) तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, अंतिम सामन्यात टीम इंडिया बदललेल्या शैलीत दिसणार आहे.
गेल्या महिन्यात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आदिदास सोबत 2028 पर्यंत करार केला होता. भारतीय पुरुष क्रिकेट संघाव्यतिरिक्त, आदिदास महिला वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट संघ, भारत A, India B आणि 19 वर्षाखालील पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या जर्सी प्रायोजित करेल. हा करार जवळपास ३५० कोटींचा असल्याचे बोलले जात आहे.
वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटसाठी वेगवेगळ्या जर्सी आहेत. पण यातील टी-२० संघाची जर्सी ही कॉलर लेस असणार आहे. त्याचसोबत जर्सीवर एक वेगळा डिझाईनचा टेक्स्चरही देण्यात आला आहे. (Sports News) तिन्ही जर्सीमधील एकसारखेपणा म्हणजे या तिन्ही जर्सीच्या खांद्यावर तीन पट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी टीम इंडिया गडद निळ्या कॉलरलेस जर्सी घालून मैदानात उतरेल. दुसरीकडे, एकदिवसीय सामन्यांसाठी, कॉलर असलेल्या जर्सीत हलका निळा रंग वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर कसोटी सामन्यांची जर्सी पांढरी असते. (Sports News) अॅडिडासच्या तीनही जर्सीच्या खांद्यावर 3-3 पट्टे आहेत. या जर्सी काश्मीरमधील डिझायनर आकिब वानी यांनी डिझाइन केल्या आहेत. त्याचवेळी, भारतीय क्रिकेट संघाचा शर्ट प्रायोजक अद्याप जाहीर झालेला नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : पुण्यातील मारुंजी गावच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड