Sports News : बाडोस : भारत आणि वेस्ट इंडिज संघांत सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात असून, या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार पडला. पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेत एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली. त्याने हा पराक्रम करताना कपिल देव आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 23 षटकांत 114 धावांत सर्वबाद झाला.
वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 23 षटकांत 114 धावांत सर्वबाद
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात 22.5 षटकांत 5 विकेट्स गमावून 118 धावा करत विजय नोंदवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. (Sports News ) जडेजा आता वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. जडेजाच्या आता वेस्ट इंडिजविरुद्ध 44 विकेट्स आहेत. त्याने माजी भारतीय कर्णधार कपिल देव (43) यांना मागे टाकले आहे. त्याचवेळी जडेजाने याच सामन्यात 41 बळी घेणाऱ्या अनिल कुंबळेलाही मागे टाकले.
याशिवाय मोहम्मद शमीचे नावही या यादीत आहे. शमीने वेस्ट इंडिजविरुद्ध 37 विकेट घेतल्या आहेत. या यादीत पाचवे नाव हरभजन सिंगचे आहे. (Sports News ) हरभजनने वेस्ट आता वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 33 विकेट घेतल्या. या यादीत जडेजा अव्वल असून, भारताकडून आता या मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. अशा स्थितीत जडेजाला आपली आघाडी आणखी वाढवण्याची चांगली संधी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : एम्बाप्पेला 2725 कोटींची ऑफर; संघात घेण्यासाठी रिअल माद्रीद, सौदीमध्ये चढाओढ.