Sports News : १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ येथे दोन कसोटी, तीन वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. BCCI शुक्रवारी वन डे व कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले. टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. या दौ-याच्या माध्यमातून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिस-या पर्वाची सुरुवात करणार आहे. यासोबतच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारी करण्याची संधी टीम इंडियाला मिळणार आहे.
दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व शर्माच करताना दिसणार आहे. (Sports News ) त्याचबरोबर अजिंक्य रहाणे कसोटीत तर हार्दिक पंड्या वनडेत उपकर्णधार असतील. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. WTC Final मधून भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे पुन्हा उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
असा आहे भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत, ईशान किशन, आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी
वनडे मालिकेचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल,(Sports News ) कुलदीप यादव, जयेदव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमारन मलिक, मुकेश कुमार
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
12 ते 16 जुलै : पहिली कसोटी (विंडसर पार्क, डॉमिनिका)
20 ते 24 जुलै : दुसरी कसोटी (क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेचे वेळापत्रक :
27 जुलै : पहिली वनडे (केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस)
29 जुलै : दुसरी वनडे (केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस)
1 ऑगस्ट : तिसरी वनडे (ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीने रचला इतिहास
Sports News : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; 31 ऑगस्टपासून होणार सुरुवात
Sports News : टीम इंडियाच्या नवीन ‘जर्सी’चं अनावरण