Sports News : मुंबई : आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यानंतर आनंद अद्याप मावळत नसताना एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी ही काळजीत टाकणारी गोष्ट आहे. (Dhoni will be admitted to the hospital, fans are worried!)
कोकिलाबेन रुग्णालयात धोनी दाखल होणार
आयपीएलच्या या हंगामात दुखापतीमुळे त्रस्त असलेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी रुग्णालायात दाखल होण्याची शक्यता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे एमएस धोनीला रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. त्याच्यावर काही चाचण्या केल्या जाणार असून कोकिलाबेन रुग्णालयात धोनी दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Sports News )
विशेष म्हणजेच आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर चेन्नई संघ सेलिब्रेशन करत असताना धोनीच्या गुडघ्याला पट्टा बांधलेला दिसत होता. त्यामुळे चाहत्यांची काळजी वाढली होती. (Sports News ) त्यांनंतर आता त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला धोनी लवकरच उपचारासाठी रुग्णालायत दाखल होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल दाखल केले जाऊ शकते. तिथे धोनीच्या गुडघ्याबाबत काही चाचण्या होऊ शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : पुण्यातील मारुंजी गावच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड