Sports News : सिडनी फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे आणि त्याचा क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) यांच्यातील संबंध अतिशय बिघडले आहेत. आगामी हंगामापूर्वी पीएसजी संघ जपानच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, या दौऱ्यासाठी एम्बाप्पेची संघात निवड करण्यात आलेली नाही. इतकेच नाही तर पीएसजी क्लबने त्याला विकण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलालने एम्बानप्पेला संघात घेण्यासाठी 2725 कोटींची ऑफर दिली आहे. (Sports News)
पीएसजीनंतर एमबाप्पे रिअल माद्रिदमध्ये जावू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पण आता एम्बाप्पेला साईन करण्याच्या शर्यतीत अल हिलाल क्लबदेखील सामील झाला आहे. सध्या रिअल माद्रिद व सौदीमध्ये एम्बाप्पेसाठी चढाओढ आहे. एम्बाप्पेला अनेक वर्षापासून या स्पॅनिश क्लबकडून खेळण्याची इच्छा होती. त्याला लहानपणापासूनच रिअल माद्रिदला जायचे होते, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते आजतागायत शक्य झाले नाही. (Sports News)
रिअल माद्रितशिवाय मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, चेल्सी हे संघही एम्बाप्पेला साईन करण्याच्या स्पर्धेत आहेत. एमबाप्पेने पीएसजीसोबत नवीन करार केला होता. त्यावेळी त्याने 2025 पर्यंत संघासोबत राहण्याचे आश्वासन दिले होते.