जोहान्सबर्ग: अखेरच्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. आफ्रिकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
भारतीय संघाची प्लेईंग 11
यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 –
रीजा हेंड्रिक्स, मैथ्यू ब्रीट्जके, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, लिज़ाद विलियम्स, तबरेज शम्सी, नंदरे बर्गर, डोनोवन फरेरा, केशव महाराज