पुणे प्राईम न्यूज: भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलच्या ताज्या हेल्थ अपडेटने टीम इंडिया आणि चाहत्यांची चिंता वाढवली आहे. डेंग्यूने त्रस्त असलेल्या शुभमन गिलला प्लेटलेट्स कमी झाल्याने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुभमन गिल बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. आता शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता दिसत नाही. गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार आहे.
शुभमन गिलचे हेल्थ अपडेट बीसीसीआयने मंगळवारी प्रसिद्ध केले. हेल्थ अपडेटमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, शुभमन गिल टीमसोबत दिल्लीला गेलेला नाही. तो चेन्नईत राहूनच उपचार घेईल. ताज्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी शुभमन गिलच्या प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या शुभमन गिल चेन्नईच्या रुग्णालयात दाखल आहे.
गिल संघातच राहणार
शुभमन गिल यांचा डेंग्यूचा अहवाल गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला होता. यानंतर रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यातून गिल बाहेर पडला. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी गिल तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता याची काही शक्यता दिसत नाही. डेंग्यूसारख्या आजारातून बरे होण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात. अशा स्थितीत गिल पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच सरावात परतू शकेल.
तथापि, बीसीसीआय गिलच्या बदलीची घोषणा करणार नाही. तो विश्वचषकात संघाचा एक भाग राहील. गिल हा या वर्षातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. एकदा पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर गिल विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठा गेम चेंजर ठरू शकतो.
हेही वाचा:
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आक्रमक मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवला
एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ: एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने याचिका फेटाळली