क्राइस्टचर्च : पावसाला सुरुवात झाल्याने भारत व न्यूझीलंड यांच्या दरम्यानची लढत थांबविण्यात आली असून न्यूझीलंडला जिंकण्यासाठी ३२ षटकांत ११६ धावांची गरज आहे. पावसाने खेळ थांबविला तेव्हा न्यूझीलंड संघाने १८ षटकांत १ बाद १०४ धावा केल्या होता. त्यामुळे आता पाऊस भारताचा संभाव्य पराभव टाळू शकणार का हे पाहणे उत्साकतेचे ठरणार आहे. सध्या डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंड संघ सध्या आघाडीवर आहे.
तत्पूर्वी, भारताने फलंदाजी करताना ४७. ३ षटकात सर्वबाद २१९ धावा केल्या. वाशिंग्टन सुंदरने धडाकेबाज फलंदाजी करताना ५१ धावांची तर श्रेयस अय्यरने ४९ धावांची खेळी करताना भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती.
बाकी फलंदाज मैदानावर हजेरी लावून तंबूत परतले. न्यूझीलंड कडून डॅरिल मिचेल व अॅलन मिले यांनी भेदक गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन, टीम साऊथीने २ तर लॉकी फर्गसन व मिचेल सेंटनरने प्रत्येकी १ गडी बाद केला केला.
पाऊस सुरु झाला तेव्हा न्यूझीलंडने १८ षटकांत १ बाद १०४ पर्यंत मजल मारली होती. सलामीवीर फिन अॅलन व डेवोन कॉन्वे यांनी ९७ धावांची सलामी दिली .
फिन अॅलनने आक्रमक फलंदाजी करताना ५४ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. यात त्याने ८ चौकार व १ षटकार लगावला. त्याला डेवोन कॉन्वेने ६ चौकारांच्या मदतीने ३८ धावा करताना सुरेख साथ दिली. सध्या कर्णधार केन विल्यमसन ० धावांवर खेळत आहे.