Tuesday, August 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : शादी डॉट कॉमवर जुळलं नातं; लग्नानंतर हुंड्याच्या मागण्यांनी संसार उद्ध्वस्त! “१५ तोळे सोने, फ्रिज, टीव्ही, २ लाख रुपये आण…” म्हणत विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 13:23

Pune फुरसुंगी, ता. ८ : ऑनलाईन मॅट्रिमोनी संकेतस्थळावरून जुळलेलं नातं अवघ्या काही महिन्यांतच हुंडा, मानसिक छळ आणि कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात उघडकीस आली आहे. “१५ तोळे सोने द्यायला हवे होते, फ्रिज, वॉशिंग मशीन, ६५ इंची टीव्ही आणि घरासाठी २ लाख रुपये आण,” अशी मागणी करत विवाहितेला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे, नणंद आणि नणंदेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune

पती निहाल संजय जाधव, सासु अर्चना संजय जाधव ,सासरे संजय जाधव, नणंद आसावरी रोहित वांजे आणि रोहीत वांजे (सर्व रा. लक्ष्मीनगर पर्वती पायथा, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडीत विवाहिता या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असून त्या फुरसुंगी येथे माहेरी वास्तव्यास आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘शादी डॉट कॉम’ या मॅट्रिमोनी वेबसाईटवरून त्यांची ओळख निहाल संजय जाधव याच्याशी झाली होती. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणी काळभोर येथील संकल्प लॉन्समध्ये विवाह पार पडला.Pune

“१५ तोळे सोने देणारे स्थळ नाकारलं…”
लग्नानंतर सुरुवातीपासूनच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. “आम्ही मुलासाठी १५ तोळे सोने देणारे स्थळ नाकारले, तुम्ही तरी तेवढं द्यायला हवं होतं,” असे म्हणत सासू अर्चना जाधव या वारंवार टोमणे मारत होत्या. तसेच “चांदीचे देव, भांडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ६५ इंची टीव्ही काहीच आणलं नाही,” असे बोलून अपमानित करत होत्या. फिर्यादी यांचे लग्नाआधी पतीसोबत वेगळं राहण्याचं ठरलं होतं, मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींनी त्यास विरोध केल्याने घरात वाद सुरू झाले. सततच्या मानसिक त्रासामुळे विवाहिता आणि त्यांचे पती वेगळे राहत असतानाही सासू-सासरे वारंवार फोन करून संसारात हस्तक्षेप करत होत्या.  Pune

“हीला सोडून दे…”; नणंद-मेहुण्याकडूनही धमक्या
फ्लॅट घेण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर सासरच्या घरी बोलावून “हीला सोडून दे, हीला नांदवायचं नाही,” असे सांगत नणंद आसावरी वांझे आणि तिचा पती रोहित वांझे यांनीही फिर्यादीला धमकावले आहे. तसेच “आमच्या घरात काहीच घेऊन आली नाहीस, नीट राहा नाहीतर तुला बघू,” अशी धमकी देण्यात आली आहे.

 

दरम्यान, संसारातील वाद वाढत असताना पती निहाल जाधव यांनी दारू, मित्रपरिवार आणि आई-वडिलांच्या दबावामुळे वारंवार भांडण केली आहेट. ५ मे रोजी झालेल्या वादादरम्यान पती निहाल जाधव याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर सासू-सासरे घरी आले असता “आमच्या म्हणण्यानुसार राहावं लागेल,” असे सांगून वाद वाढला. यावेळी फिर्यादीची आई या मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असता सासू अर्चना संजय जाधव यांनी त्यांनाही मारहाण केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेचे पती निहाल जाधव यांना बीपी आणि छातीच्या संसर्गाचा त्रास असल्याची माहिती लग्नानंतर समजल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच घर खरेदीसाठी लोन प्रक्रिया सुरू असताना पतीवर आधीपासूनच ६ लाखांचे कर्ज आहे. या सर्व प्रकारामुळे मानसिक छळ सहन करावा लागल्याचे सांगत फिर्यादी यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार फुरसुंगी पोलीस ठाण्यात पाच जणांच्या भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Pune

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूका आता डायरेक्ट पुढच्या वर्षी! निवडणुकीचं गणित कोलमडलं…

Tuesday, 18 August 2026, 18:30

थेऊर येथे जागतिक आदिवासी व वीर एकलव्य जयंती उत्सव साजरा

Tuesday, 18 August 2026, 18:27

देऊळगावराजे तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे ‘रमी’चा डाव; सहा जण पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 18 August 2026, 18:10

मलठणमध्ये २२ लाखांचा एमडी जप्त; दोघांना अटक…..

Tuesday, 18 August 2026, 17:52

एकाच दिवशी लोणी काळभोरमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका; शेतरस्त्यांपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत आढावा आमदार माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणार

Tuesday, 18 August 2026, 17:49

मंत्रिमंडळ बैठकीतले १० मोठे धडाकेबाज निर्णय! पंढरपूर मंदिराबाबत मोठी घोषणा; पुण्यातील जमिनीबाबतही मोठा निर्णय, वाचा सविस्तर….

Tuesday, 18 August 2026, 17:39
Next Post

Saswad News : वीरच्या एसटीत चढताना महिलेच्या गळ्यातील ३ लाखांच्या सोन्याचे गंठणवर चोरट्याने मारला डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.