Tuesday, August 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकाच दिवशी लोणी काळभोरमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका; शेतरस्त्यांपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत आढावा आमदार माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणार

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 August 2026, 17:49

लोणी काळभोर, ता. 18 : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बारमाही शेतरस्ते उपलब्ध करून देण्यासह तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (ता. 20) लोणी काळभोर येथे दोन महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही बैठका एकाच ठिकाणी मात्र वेगवेगळ्या वेळेत होणार असल्याने महसूल, पंचायत समिती, पोलिस, भूमी अभिलेख, कृषी, वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सकाळी 10 वाजता साई मंदिर हॉल, रामदरा रोड, लोणी काळभोर येथे बैठक होणार आहे. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

राज्य शासनाच्या 7 जानेवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बारमाही शेतरस्ते उपलब्ध करून देणे, शेतीमालाची वाहतूक सुलभ करणे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. त्यानुसार हवेली तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर आमदारांची नाराजी

या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात यापूर्वी 20 एप्रिल 2026 रोजी आमदार माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही अधिकारी बैठकीस गैरहजर राहिल्याने आमदार कटके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यावेळी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना अद्ययावत माहितीसह स्वतः वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेश तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी दिले आहेत.

 

बैठकीस लोणीकंद व लोणी काळभोर पोलिस ठाण्यांचे संबंधित अधिकारी, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख विभाग, तालुका कृषी अधिकारी, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्य आणि मंडल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी आरोग्य व्यवस्थेचा आढावा

दरम्यान, याच दिवशी दुपारी 12 वाजता तालुका स्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची प्रथम सर्वसाधारण सभा याच साई मंदिर हॉलमध्ये होणार आहे. पंचायत समिती हवेलीच्या आरोग्य विभागाच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील आरोग्यविषयक विविध प्रश्न, आरोग्यवर्धिनी केंद्रांची स्थिती, नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा आणि संबंधित विभागांशी समन्वय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरन गोरे यांनी समितीच्या सदस्यांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी प्रश्नांना मिळणार न्याय; आरोग्य यंत्रणाही होणार सक्षम

हवेली तालुका पाणंद रस्ते समिती तसेच हवेली तालुका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे अध्यक्ष तथा शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दोन्ही बैठकांमुळे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. पाणंद रस्ते व शिवरस्त्यांच्या बळकटीकरणाला चालना मिळेल. तसेच या बैठकीच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य यंत्रणाही अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे सकाळी शेतरस्ते आणि दुपारी आरोग्य व्यवस्थेचा आढावा असा प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस लोणी काळभोरमध्ये ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकीत कोणते निर्णय होतात आणि शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर कोणती ठोस कार्यवाही निश्चित होते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूका आता डायरेक्ट पुढच्या वर्षी! निवडणुकीचं गणित कोलमडलं…

Tuesday, 18 August 2026, 18:30

थेऊर येथे जागतिक आदिवासी व वीर एकलव्य जयंती उत्सव साजरा

Tuesday, 18 August 2026, 18:27

देऊळगावराजे तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे ‘रमी’चा डाव; सहा जण पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 18 August 2026, 18:10

मलठणमध्ये २२ लाखांचा एमडी जप्त; दोघांना अटक…..

Tuesday, 18 August 2026, 17:52

एकाच दिवशी लोणी काळभोरमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका; शेतरस्त्यांपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत आढावा आमदार माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणार

Tuesday, 18 August 2026, 17:49

मंत्रिमंडळ बैठकीतले १० मोठे धडाकेबाज निर्णय! पंढरपूर मंदिराबाबत मोठी घोषणा; पुण्यातील जमिनीबाबतही मोठा निर्णय, वाचा सविस्तर….

Tuesday, 18 August 2026, 17:39
Next Post

मलठणमध्ये २२ लाखांचा एमडी जप्त; दोघांना अटक.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.