लोणी काळभोर (पुणे) : आदिवासी समाज हा या देशाचा मूळ रहिवासी असून, निसर्गपूजक आणि समृद्ध संस्कृतीचा वारसदार आहे. मात्र, बदलत्या आधुनिक काळात आपल्या समृद्ध संस्कृतीचे रक्षण करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच समाजाने एकत्र येऊन शिक्षणाची कास धरणे काळाची गरज बनले आहे. समाजातील प्रत्येक मुला-मुलीने शिक्षण घेऊन पुढे आले तरच आदिवासी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे अध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी केले.

थेऊर येथील नवनाथ तरुण मंडळ झांज पथक आयोजित जागतिक आदिवासी दिवस व वीर एकलव्य जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विर एकलव्य बिरसा मुंडा तंट्या भिल राघोजी भांगरे महापुरुष शबरी माता जयंती उत्सव सोहळा उत्सावात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना सूर्यवंशी बोलत होते.

यावेळी एकलव्य जनता दल संघटनेचे शिवदास पवार, हवेलीचे सभापती युवराज काकडे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, संतोष काकडे, सामाजिक कार्यकर्ते सुजित काळे, सतिष धुळे, सचिन धारवाड, संजय गायकवाड, गणेश बरडे, छबू धारवाड, सागर राऊत, आर्जुन माळी, पिंटु बरडे, अविनाश पवार, गोकुळ गायकवाड, यांच्यासह असंख्य आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते.

एकलव्य जनता दल संघटनेचे शिवदास पवार अध्यक्ष म्हणाले, “आपली जल-जंगल-जमिनीशी नाळ जोडणारी जल-निसर्गपूजक संस्कृती, पारंपारिक सण, कला आणि जीवनशैली हे आदिवासी समाजाचे खरे वैभव आहे. आधुनिकतेच्या ओघात ही संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक समाजबांधवाची जबाबदारी आहे. कोणत्याही समाजाचा विकास हा त्याच्या एकजुटीवर अवलंबून असतो.







