Pune News : पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे चंदीगडच्या आयएम हिमल गुसैन याने नऊ फेऱ्यांपैकी ८.५ गुणांसह विजेतेपद पटकाविले आहे. त्याला ५० हजाराचे रोख बक्षीस आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पार पडल्या स्पर्धा
वाघोली (ता. हवेली) येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटमध्ये नुकत्याच पुणे आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. या या स्पर्धांचे आयोजन जीएच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाऊंडेशन आणि कल्पना प्रकाश वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चंदीगडच्या आयएम हिमल गुसैन याने पटकाविला आहे. (Pune News) तर तेलंगणाच्या जे. रामकृष्णने ८ गुणांसह दुसरे स्थान मिळवले . त्याला ३० हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. एफएम निखिल दीक्षितने तिसरे स्थान पटकावले. त्याला २० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात मिळाले. ICF चेन्नईचे GM R.R. लक्ष्मण चौथे स्थान मिळवून मिळविले. त्याला १५ हजार रुपयांचे परितोषिक देण्यात आले.
१६ वर्षांखालील वयोगटात यश अभिजित पाटील कर्नाटकने ७/९ गुण मिळवून प्रथम, कबनुरकर रुषिकेश याने ६.५/९ गुणांसह द्वितीय आणि कबनुरकर रुषिकेश याने ६.५/९ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. ईश्वर रामटेके याने ६/९ गुणांसह प्रथम, परम समीर जालानने २रा आणि अलौकिक सिन्हा याने १३ वर्षांखालील वयोगटात तिसरा क्रमांक मिळविला.
बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान एकूण २ लाख रुपयाचे परितोषिक वाटप करण्यात आले. रोख पारितोषिकांसह, ७, ९, ११, १३, १५ वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी १० वर्षांखालील पहिल्या १० खेळाडूंना आकर्षक ट्रॉफीचे वाटप करण्यात आले. विविध फिडे रेटिंग श्रेणी गटांच्या पारितोषिकांसह सर्वोत्कृष्ट अनुभवी पुरस्कार देखील देण्यात आले. (Pune News) लवाद आयोग पीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र शिदोरे यांच्या उपस्थितीत लेफ्टनंट कर्नल डॉ. विक्रांत गडकरी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जी.एच रायसोनी ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन चे अध्यक्ष सुनील रायसोनी व कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीएचआरसीईएम पुणे संचालक डॉ.आर.डी.खराडकर, उपसंचालक डॉ. एन.बी. हुल्ले, उपसंचालक, एन. बी. हेंद्रे हे होते. अधिष्ठाता डॉ. एन.यू. कोरडे, कल्पना प्रकाश वेलफेअर फाऊंडेशनचे सचिव भूषण श्रीवास, क्रीडा संचालक, रायसोनी कॉलेज पुणे डॉ. निशिगंधा पाटील, आयोजन समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एमसीए, गिरीश व्यास आणि आय.ए. अजिंक्य पिंगळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. एमसीए निरीक्षक समिती सदस्य,.एस.एस.सोमण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
दरम्यान, या स्पर्धेला पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळ (PDCC), महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना (MCA), ऑल इंडिया चेस फेडरेशन (AICF) आणि FIDE यांचे सहकार्य लाभले. (Pune News) आयए अजिंक्य पिंगळे हे मुख्य लवाद होते ज्यांना आयए विनिता शोत्री, उपमुख्य लवाद, एफए जुईली कुलकर्णी, एफए अमित टेंफुर्णे, एफए प्राची मयेकर, एफए शुभम सोनी, एसएनए प्रेयस अंबाडे, एसएनए देवव्रत तिवारी, सागर साखरे, ए. प्रथमेश माचावे यांनी सहकार्य केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ग्रामसेविकेला मारहाण करून नोटीस फाडली; महिलेला २५ हजार रुपये दंडासह एक वर्ष सक्तमजुरी