Pimpri News : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मानाने 66 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब सदन आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब सदन आयोजित
या कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने सोमवारी (दि.23) कावेरीनगर क्रीडा संकुल येथे पिंपरी चिंचवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ माती व गादी विभागानी स्पर्धा होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे न सरचिटणीस संतोष माचुत्रे यांनी दिली.
कुस्तीगीरांची वजने स्पर्धेच्या दिवशी सोमवारी सकाळी 9 ते 11 या क्रीडा संकुलात घेण्यात येतील, वजने झाल्यावर लगेच कुस्ती स्पर्धेला सुरुवात होईल.
पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या पदाधिकारी व सभासद तसेच शहरातील कुस्तीगीर , कुस्ती शौकीन, वस्ताद मार्गदर्शक मंडळी यांनी उपस्थित राहावे.
असे अवाहन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी केले आहे. वरिष्ठ माती व गादी विभाग 57,61, 65, 70, 74, 79, ८६, ९२ ९७ किलो साठी महाराष्ट्र केसरी किताब लढत साठी 86 से 125 किलो वजन गट आहेत. कुस्तीगीरानी अधिक माहितीसाठी सरचिटणीस पै संतोष माचुत्रे यांच्याशी 9822049428 संपर्क साधावा.