दीपक खिलारे
इंदापूर : तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील पै. मामा तरंगे यांने प्रतिस्पर्धी पैलवानाला आसमान दाखवून मानाच्या कुस्तीतील मानाचा किताब मानला जाणारा ‘मुठा केसरी’वर आपली मोहर लावली.
“मुठा’ केसरीच्या गदेस अनन्य साधारण महत्व आहे. मुठा केसरीमध्ये दिल्या जाणाऱ्या गदेला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. लाखो कुस्तीशौकिनांचे डोळे “मुठा ‘ केसरीच्या किताबाची अंतिम कुस्ती पाहाण्यासाठी दरवर्षी वाट पाहत असतात. विजेत्या मल्लास गदेचे वेध असते. चमचमणारी चांदीची गदा जो जिंकतो तो मुठा केसरीचा मानकरी व कुस्तीचा सम्राट बनतो.
पै.मामा तरंगे यांनी हा किताब मिळवल्याने इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे,सरडेवाडी गावचे माजी उपसरपंच पै. विजय शिद. सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी त्याचा सत्कार केला.