दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सोनिया मुलाणी व सृष्टी भोंग या दोन्ही कुस्तीपटूंची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक संचालनालय यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे दि. १३ व १४ फेब्रुवारी रोजी राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यात सतरा वर्षे व ६९ किलो वजन गटात सोनिया मुलाणी हिने प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक मिळवले.
तर या स्पर्धेत सृष्टी भोंग हिने सतरा वर्षे व ७३ किलो वजन गटात सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे त्यांचा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक मिळवल्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
या विजेत्या मल्लांचा मुंबई क्रिडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक स्नेहल साळुंखे व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरव केला.
या दोघींना जनहीत कला व क्रीडा ट्रस्ट संचलीत बापूसाहेब आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे अध्यक्ष पै. अस्लम मुलाणी, महिला प्रशिक्षिका अनिसा मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे