New Delhi News : नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या साक्षी मलिक हिने आंदोलनातून माघार घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. साक्षीने तिच्या रेल्वेतील नोकरीवर देखील रुजू झाली आहे. साक्षीने माघार घेतल्याने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला धक्का बसला आहे. (Big news! Sakshi Malik’s sudden withdrawal from the movement)
अचानक अशी माघार का घेतली असा सवाल केला जात आहे
दरम्यान, या आंदोलनासाठी आपली पदकं गंगेत विसर्जीत करायला निघालेल्या साक्षी मलिकने अचानक अशी माघार का घेतली असा सवाल केला जात आहे. (New Delhi News) साक्षीने ब्रिजभूषण विरोधातील आंदोलनातून माघार घेतल्याने मोठा झटका मानल्या जात आहे.
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.(New Delhi News) ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत होते. मात्र, 28 मे रोजी पोलिसांनी जंतरमंतर येथून त्यांना हाकलून लावले होते. कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीपटूंच्या आंदोलनापासून स्वतःला दूर केले आहे. एवढेच नाही तर ती रेल्वेत नोकरीवर परतली आहे. साक्षीने या आंदोलनापासून दुरावण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
वृत्तानुसार, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट देखील आंदोलनातून माघार घेऊ शकतात आणि शक्य तितक्या लवकर त्यांच्या कामावर परत येऊ शकतात. (New Delhi News) या तीन पैलवानांच्या नेतृत्वाखाली ब्रिजभूषणला विरोध केला जात होता. या तिघांना हटवल्याने हे आंदोलन पूर्णत: संपल्याचे मानले जात आहे.
याआधी शनिवारी रात्री साक्षी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांकडे ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी केली. (New Delhi News) यानंतर गृहमंत्र्यांनी कुस्तीपटूंवर कोणताही भेदभाव न करता संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिले होते. अमित शाह म्हणाले की, या प्रकरणी कायदा मार्ग काढेल. पोलीस तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत
7 महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिज भूषण विरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल केले. (New Delhi News) पहिली एफआयआर अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणांचा पोलिस तपास सुरू आहे.
अशी आहे साक्षी मलिकची कारकिर्द
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकले होते. 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये साक्षीने 58 किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर 2015 मध्ये दोहा येथे झालेल्या सीनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये साक्षीने 60 किलोमध्ये कांस्यपदक जिंकले.
ऑलिम्पिक – रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये कांस्यपदक जिंकले (५८ किलो)
कॉमनवेल्थ गेम्स – बर्मिंगहॅम 2022 मध्ये सुवर्ण (62 किलो), ग्लासगो 2014 मध्ये रौप्य (58 किलो), गोल्ड कोस्ट 2018 मध्ये कांस्य (62 किलो).
आशियाई चॅम्पियनशिप – दोहा 2015 मध्ये कांस्य (60 किलो), नवी दिल्ली 2017 मध्ये रौप्य (60 किलो), बिशेक 2018 (62 किलो) मध्ये कांस्य, शियान 2019 (62 किलो) मध्ये कांस्य.
कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप – जोहान्सबर्ग 2013 मध्ये कांस्य (63 किलो), जोहान्सबर्ग 2016 मध्ये गोल्ड (62 किलो).
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
New Delhi News : नवीन संसदभवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून मंत्रोच्चारासह आशीर्वाद