MS Dhoni Birthday पुणे : क्रिकेट विश्वात आपलं नाव कोरणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज 7 जुलैला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या दमदार फलंदाजी आणि यष्टिरक्षणासोबतच धोनीच्या हेअरस्टाइलनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. (MS Dhoni Birthday) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना धोनीला त्याच्या लांब केसांसाठी ओळखले जात होते. (MS Dhoni Birthday) पण 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने एक अनोखी हेअर स्टाईल केली. तेव्हापासून आतापर्यंत त्याने अनेक अप्रतिम लूक्स देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. (MS Dhoni Birthday)
आज आम्ही तुम्हाला धोनीच्या काही चर्चेत राहिलेल्या हेअर स्टाईलबद्दल सांगत आहोत…
महेंद्रसिंग धोनीच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खांद्यापर्यंत लांब केस होते. जेव्हा तो मैदानावर फलंदाजीसाठी आला तेव्हा तो त्याच्या क्रिकेटच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध झालाच पण त्याच्या केसाचीही त्यावेळी चर्चा झाली. एमएस धोनीच्या अनेक चाहत्यांनी ही हेअरस्टाइल फॉलो केली. बऱ्याच काळापासून लोकांमध्ये लांब केसांची क्रेझ होती. त्याचे लांब केस अजूनही लोकांच्या लक्षात आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर एमएस धोनीने हेअर स्टाइलमध्ये काही बदल केले. पूर्वी जे केस सरळ दिसत होते, ते आता नैसर्गिक कुरळे असलेली क्रॉप स्टाईल फॉलो करत आहेत. लांब केसांसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केस कापले. त्यानंतर, वेगवेगळ्या प्रसंगी, त्याने केसांची शैली खूप बदलली आणि अनेकप्रकारे प्रयोग केले.
दुबईत आशिया चषक सुरू होण्यापूर्वी कॅप्टन कूलने पुन्हा एकदा आपल्या नव्या हेअर स्टाईलने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तो वीहॉक स्टाईलमध्ये मस्त दिसत होता. त्याची हेअर स्टाईल चाहत्यांनाही आवडली आणि सोशल मीडियावर ती खूप व्हायरल झाली. ही हेअरस्टाईल सर्व चाहत्यांनी खूप फॉलो केली होती.
गेल्या वर्षी, धोनीने त्याच्या हेअरस्टाईलमध्ये आणखी एक बदल केला. फॅन्सी आणि मस्त मेकओव्हरपासून दूर जात त्याने क्लासी इंग्लिश क्रॉप हेअरस्टाइल फॉलो केली. धोनीची ही हेअरस्टाईल त्याच्या पर्सनालिटीला खूप साजेशी अशी दिसत होती.
कॅप्टन धोनी हा केवळ क्रिकेटपटू नव्हता तर तो भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणूनही कार्यरत होता. यादरम्यान कॅप्टन कूल मिलिटरी बझ कट हेअरस्टाइलमध्ये दिसला. त्यांची ही स्टाईल चांगलीच गाजली.