राहुलकुमार अवचट
यवत : दौंड पंचायत समितीचे पहिले सभापती, कैलास शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव वामनराव कुल व दौंडचे दिवंगत आमदार, लोकनेते स्व. सुभाष आण्णा कुल यांच्या स्मरणार्थ राहू येथील शंभू महादेव प्रतिष्ठाण, आमदार राहुलदादा कुल प्रतिष्ठाण व राहू ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या ‘आमदार चषक – राहू ‘ या गाव वाईज फुलपीच टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या २०२३ च्या हंगामाचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज पार पडले.
शंभू महादेव प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सन १९९१ पासून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून स्पर्धेसाठी अतिशय उत्तम मैदान तयार करण्यात आले आहे.
अनेक नामांकित खेळाडू या मैदानावर खेळले आहेत अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले व स्पर्धेमध्ये सहभागी सर्व खेळाडू व शंभू महादेव प्रतिष्ठाण, आमदार राहुलदादा कुल प्रतिष्ठाणच्या सर्व सहकाऱ्यांना यशस्वी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
गाववाईज व तालुका वाईज संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी आमदार राहुल कुल यांच्याकडून प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, सुखदेव चोरमले यांच्याकडून द्वितीय परिषदेचे ७५ हजार रुपये, प्रशांत शिंदे यांच्याकडून तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये.
सचिन हरगुडे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक २५ हजार रुपये, तृप्ती मगर यांच्याकडून पाचवे प्रादेशिक १५ हजार रुपये ,युवराज बोराटे यांच्याकडून सहावे पारितोषिक १५ हजार रुपये, वैशाली डुबे यांच्याकडून सातवे पारितोषिक १५ हजार रुपये, नवनाथ देवकर यांच्याकडून आठवे पारितोषिक १५ हजार रुपये देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, सरपंच दिलीप देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, सुखदेव चोरमले, युवराज बोराटे, बबन अत्तार, माऊली म्हेत्रे, कैलास खेडेकर, गणेश चव्हाण, सागर पिलाने, गोविंद
यादव, कांतीलाल काळे,
राहुचे पांडुरंग सोनवणे, हनुमंत बोरवणे, बाळासाहेब शिंदे, शहाजी कुलाळ, संतोष पवार, देविदास डुबे, गणेश चव्हाण, निखिल चव्हाण यांच्यासह परिसरातील क्रिकेटप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेसाठी समालोचक म्हणून ऋषी पवार व प्रदीप ओव्हाळ हे काम पाहतील.