लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील सुप्रसिध्द हॉटेल रवाईनने सलग १६ व्या वर्षी आयोजित केलेल्या टेनिस स्पर्धेत मुलींमध्ये मेघना जीडी, माया राजेश्वरन तर मुलांमध्ये कबीर चोटानी आणि अद्विक नाटेकर विजेते ठरले.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने दरवर्षी हॉटेलच्या वतीने ‘रवाईन हाॅटेल टेनिस चॅम्पियनशिप नॅशनल सिरीज’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २१ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्य स्तरीय टेनिस खेळाडू शार्लोट व्हीटबी कोल्स यांच्या हस्ते, संयोजक रजाकभाई सुनेसरा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विजेत्यांना ट्रॉफी व रोख पारितोषिक देण्यात आले.
जावेद सुनेसरा यांनी हॉटेल रवाईनच्या वतीने गेली तीन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आदी राज्यांतून १६ वर्षा आतील सुमारे १२५ हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.