बीजिंग : चीनमध्ये सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. अशातच महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने सुवर्णपदक पटकावले. त्याने ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत हे पदक मिळवले आहे. अविनाशने जिंकलेल्या या पदकामुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेतील ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अविनाश साबळे हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यातच चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत.
असे असताना अविनाश साबळे याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्टीपलचेज इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अविनाश पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे.