Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता.०९ : जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी आपला दबदबा कायम ठेऊन अजिंक्य पद पटकावले. विजेत्या खेळाडूंचे व शाळेचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
भोसे (ता. खेड, जि. पुणे) येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा नुकतीच पार पडली. प्रत्येक तालुक्यातील प्रथम आलेला संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र होता. त्यामुळे या स्पर्धेमध्ये तालुकानिहाय १३ मुलांचे व १३ मुलींचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल जुनियर कॉलेजचे १४ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुलांचे संघ सहभागी झाले होते.
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांचा अंतिम सामना भोसे येथील मॉडर्न हायस्कूल यांच्यासोबत झाला. अतिशय रंगतदार झालेला हा सामना खेळाडूंनी ७ गुणांच्या फरकाने जिंकला. विद्यालयाच्या १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा अंतिम सामना बारामती येथील विद्या प्रतिष्ठानसोबत झाला. हा सामना लोणी काळभोर येथील खेळाडूंनी एक डाव दोन गुणांच्या मोठ्या फरकाने जिंकला. पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या या दोन्ही विजेत्या संघांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, विजेत्या संघातील खेळाडू व क्रीडा शिक्षक सुरेश कोरे व राजेश चौरे या दोघांचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सीताराम गवळी यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पर्यवेक्षिका रेखा पाटील, पर्यवेक्षक विलास शिंदे, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे कौतुक
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ व १९ वर्षे वयोगटात पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी प्रथम क्रमाक पटकाविला आहे. त्यामुळे विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
१४ वर्षे वयोगटातील खो-खो संघातील मुलांची नावे
सोहम श्रीपाल खामकर, रोहन श्रीराम खामकर, साहिल अंबादास वडतीले, साई योगेश साळुंखे, सुमित नवनाथ मोरे, अभिषेक कृष्ण कोळी, ऋषिकेश सतीश साळुंके, आर्यन रामा हालमे, गणेश दत्ता तेलंग, विनायक दशरथ गायकवाड, विजय नितीन कदम, इंद्रजीत प्रतापराम कुमावत, आशुतोष संतोष लंगर, अजय बाळू कुंभार, समर्थ शिवाजी पांचाळ.
१९ वर्षे वयोगटातील खो-खो संघातील मुलांची नावे
गोविंद गणपत खलसे, तेजस संतोष जाधव, पवन रामदास मकवणे, शुभम सत्यवान चव्हाण, चेतन गंगाराम बिका, कुणाल उमेश मगर, प्रथमेश उमेश दळवी, तनिष्क बाळासाहेब काळभोर, रणजीत तात्या भणगे, कृष्णा संग्राम पवार, प्रथमेश सतीश साळुंके, सोहेब इस्माईल मटके, प्रणय सीताराम शेंडगे, ऋषिकेश सीताराम गवळी, रोहन धर्माजी डवरे.