सागर जगदाळे :
भिगवण : फुरसुंगी येथे झालेल्या जिल्हास्तरीय मास रेसलिंग आणि नॉनचाकु स्पर्धेमध्ये पळसदेव (ता. इंदापूर) येथील एल जी बनसुडे स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
पुणे जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने या रेसलिंग आणि नॉनचाकु स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पळसदेव येथील एल जी बनसुडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत १४ सुवर्ण,४ रौप्य व ४ कांस्य पदकाची कमाई विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे पळसदेवच्या एल जी बनसुडे संस्थेचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला व प्रथम क्रमांकाचा चषक मिळवला.
१) मास रेसलिंग स्पर्धेतील विजेते खेळाडु
(सुवर्णपदक)
गणेश थोरात, तेजस्वीनी लहाने,
प्रसाद बनसुडे ,सिध्दी मराडे ,
सोहम गोरे ,ओमकार शेलार,
अनुष्का बनसुडे, आर्यन काळे, रोहन बनसुडे,
(रौप्यपदक)
जानव्ही काळे,
श्रीकांत बनसुडे, प्रणव बनसुडे
(कांस्यपदक खेळाडू)
अनुष्का तोंडे, कार्तीक बोराटे ,ईश्वरी जगताप, राधीका बनसुडे.
२) नाँन चाकु स्पर्धेमधिल विजेते खेळाडु
(सुवर्णपदक)
सार्थक बनसुडे, श्रूती गोडसे ,कृष्णा मारकड,यश जाधव, प्रणव बनसुडे,
(रौप्यपदक)
रोहन बनसुडे
दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष डॉ.शीतल कुमार शहा ,कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, सचिव नितिन बनसुडे ,विश्वस्त हनुमंत (आप्पा) मोरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तर यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक सागर बनसुडे यांचे प्राचार्या वंदना बनसुडे मुख्याध्यापक राहूल वायसे यांनी अभिनंदन केले.