पुणे : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलनंतर किंग कोहलीने देखील शतक ठोकले आहे. किंग कोहलीचे हे ७४ वे शतक असून या शतकासह विराटने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यातही विस्फोटक फलंदाजी करून ८० चेंडूत त्याने शतक ठोकले होते. विराटच्या या शतकानंतर त्याच्यावर सर्वस्थरातून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज पार पडत आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमनने देखील या सामन्यात ८९ चेंडूत शतक ठोकले. तर आता किंग कोहलीने देखील शतक ठोकून पुन्हा एकदा गर्जना केली आहे. विराटने ८५ चेंडूत नाबाद शतक ठोकले आहे.
विराट कोहलीने या शतकासह मायदेशात सर्वाधिक शतकं करण्याचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने मायदेशात १६० सामन्यांमध्ये २०वेळा शतक ठोकले होते. तर विराट कोहलीने मायदेशात खेळलेल्या केवळ १०१ सामन्यात २१ वेळा शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
दरम्यान, याआधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पॉन्टिंग याचा ही मायदेशातील१५१ सामन्यात १४ वेळा शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. विराट कोहलीने आतापर्यंत वनडे सामन्यात श्रीलंका विरुद्ध तब्बल १० वेळा शतक केले आहे. विराटाचे वनडे सामन्यातील ४६ वे शतक आहे.