Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिमाचल प्रदेश सरकारकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू : महाराष्ट्र सरकार या निर्णयाबाबत मागे का ? शिक्षक व कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 January 2023, 17:10

राजेंद्रकुमार गुंड

माढा : हिमाचल प्रदेश सरकारने पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली. देशभरातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावरती कोट्यवधी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु यांचे आभार मानले आहेत.

हिमाचल सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. यापूर्वी राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, पंजाब सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. पण महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकार असा निर्णय कधी घेणार ? असा संतप्त सवाल मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊ लागला आहे.

 

महाराष्ट्र सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केली. त्यावेळी अतिशय गाजावाजा करून कर्मचाऱ्यांसाठी चांगली योजना आहे असा सरकारने प्रचार, प्रसार केला. पण प्रत्यक्षात मात्र ही योजना फसवी असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने या योजनेत सरकारने कर्मचाऱ्यांची कशी फसवणूक केली हे सप्रमाण दाखवून दिले आहे.

तब्बल १५ वर्षे या योजनेत पैसे कपात केल्यानंतर सरकार याचा साधा हिशोबही देऊ शकले नाही. आणि आता एनपीएस मध्ये वर्ग करण्याचा आत्मघातकी निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता, नियोजन न करता कर्मचारी बांधवांचे आयुष्य धोक्यात आणले. कर्मचाऱ्यांचा संवैधानिक अधिकार हिरावून त्यांचे भविष्य अंधारात ढकलले.अनेक मयत कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आणले.

आता सरकार देखील या योजनेमुळे आर्थिक संकटात सापडले आहे.या सर्व दुरावस्थेला सरकार जबाबदार असून या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे होय.चालू वर्षात ९ राज्यांच्या निवडणूक प्रचारात जुनी पेन्शनचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रश्नाची दाहकता लक्षात घेऊन लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी आता करत आहेत.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू झाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील एनपीएस कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. लवकरच संघटनेच्या वतीने अभिनंदन फलक संपूर्ण जिल्ह्यात लावले जाणार आहेत.

यावेळी प्रशांत लंबे, दिगंबर तोडकरी,जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव, किरण काळे, साईनाथ देवकर,आशिष चव्हाण, अर्जुन पिसे, सचिन क्षिरसागर , शिवानंद बारबोले,सैदाप्पा कोळी, संजय ननवरे,संदीप गायकवाड, ज्ञानेश्वर चव्हाण, सतीश चिंदे, सतीश लेंडवे, बाबासाहेब घोडके, विजय राऊत, उमेश उघडे, कृष्णदेव पवार, मोहन पवार, धनंजय धबधबे, उमेश सरवळे , विठ्ठल पाटील, नमिता शिर्के, ज्योती कलुबर्मे , गायत्री काळे, स्मिता फटे, स्वाती नलावडे, दिपाली स्वामी, अरुण चौगुले,अरुण राठोड, कमलाकर दावणे,प्रविण देशमुख, राजेंद्र सुर्यवंशी, शस्वाती चोपडे, दिपक वडवेराव, रियाज मुलाणी, राजेंद्र कांबळे, महेश कसबे, नेताजी रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पेन्शन संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष कमलाकर दावणे म्हणाले कि, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारनेही 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर खात्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ जूनी पेंशन योजना लागू करावी. अन्यथा या मागणीसाठी संघटनेच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने सरकारच्या चालढकल व दिरंगाईच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलन व चळवळ उभी करणार आहे. असा इशारा दावणे यांनी दिला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

उरुळी कांचन येथील शामल पंडित यांना एलआयसीचा सर्वोत्कृष्ट ''एमडीआरटी २०२२'' चा पुरस्कार प्रदान....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.