मुंबई: IPL 2024 संदर्भात मोठी बातमी येत आहे. अष्टपैलू खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. तो गुजरातचा कर्णधार म्हणून मागील 2 हंगाम खेळला. या काळात पांड्याने एकदा संघाला चॅम्पियन बनवले तर एकदा संघ उपविजेता ठरला. यासंदर्भात आयपीएलने अधिकृत घोषणाही केली आहे. पांड्याचा संघात समावेश करण्यासाठी मुंबईने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला ट्रेड केले आहे. ग्रीन आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईने 17.5 कोटी रुपयांचा ग्रीनला ट्रेड केले आहे.
हार्दिक पांड्या 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता. येथून चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला टीम इंडियातही स्थान मिळाले. रोहित शर्मानंतर त्याला संघाचे कर्णधारपदही दिले जाऊ शकते. २०२३ च्या विश्वचषकादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. तो आयपीएल 2024 मधून मैदानात परतण्याची अपेक्षा आहे. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक जूनमध्ये होणार आहे. पांड्याही विश्वचषकासाठी संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.
हार्दिक पांड्याने 2015 पासून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. 10 अर्धशतकांच्या मदतीने 2309 धावा केल्या. स्ट्राइक रेट 146 आहे. 91 धावा ही सर्वोत्तम कामगिरी आहे. वेगवान गोलंदाज म्हणून पांड्याने 53 विकेट्सही घेतल्या आहेत. 17 धावांत 3 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
NEWS ???? – Hardik Pandya and Cameron Green traded to #MumbaiIndians and #RCB respectively.
More details on the trade here – https://t.co/kfnKd9cEEy #IPL
— IndianPremierLeague (@IPL) November 27, 2023
मुंबई इंडियन्सचे कायम ठेवलेले खेळाडू:
रोहित शर्मा, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), हार्दिक पंड्या (ट्रेड) , शम्स. मुलाणी, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद.