पुणे : आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन, ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने २१ ते २८ जानेवारी दरम्यान पुण्यात ४० हजार डॉलर्स रकमेच्या एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे हे २२ वे वर्ष असून यावेळी १५ देशांतील महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.
जागतिक क्रमवारीत ६८ व्या क्रमांकावर असलेली जर्मनीची तात्जाना मारिया, उझबेकिस्तानची निगीना अब्दुरेमोवा आणि स्वित्झर्लंडची जोआन झुगर या स्पर्धेच्या सीडिंग लिस्टमध्ये आघाडीवर असतील.
प्रामुख्याने परदेशी खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या मुख्य ड्रॉमध्ये अंकिता रैना आणि करमन कौर थांडी यांच्या व्यतिरिक्त चार भारतीय वाइल्डकार्ड खेळाडू प्रवेश करतील. आयटीएफने या स्पर्धेसाठी गोल्ड बॅज रेफ्री शीतल अय्यर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
या महिला टेनिस स्पर्धेचे २००१ साली ५ हजार डॉलर इतके बक्षीस होते. २००९ साली १० व्या वर्धापन दिनानिमित्त याचे ५० हजार डॉलर बक्षीस होते. २०१० पासून ते २०२० पर्यंत या स्पर्धेचे बक्षीस २५०० हजार डॉलर इतके होते.