पुणे : आशिया चषक २०२२ च्या चौथ्या फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवरती पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला १३० धावांचे लक्ष ठेवलं होते. मात्र, अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना पाकिस्तानने १९.२ षटकात १ गडी राखून विजय मिळवला आहे. युवा गोलंदाज नसीम शाहने अखेरच्या षटकात दोन षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण, कर्णधार मोहम्मद नबी वगळता प्रत्येक खेळाडूनं १० ते २० मध्येच धावा ठोकल्या. तर, नजीबुल्ला जद्रानने सर्वांधिक ३५ धावा केल्या. हरिस रौफने चार षटकात दोन बळी घेतले. अफगाणिस्तानने २० षटकात १२९ धावा केल्या.
१९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अफगाण गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली मोठा शॉट खेळताना झेलबाद झाला. यानंतर अफगाण गोलंदाज फरीद अहमदने आक्रमक पद्धतीने आसिफ अलीच्या दिशेने आनंद साजरा केला. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला. फरीद अहमदच्या जल्लोषाच्या स्टाईलने संतापलेल्या आसिफ अलीने आधी त्याला धक्का दिला आणि नंतर त्याची बॅट दाखवली. आसिफ अलीने बॅट उचलली तेव्हा अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी मध्यभागी येऊन त्याला रोखले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The actual video of shameful attitude by this unknown bowler of Afghanistan shoving gestures in the face of Asif Ali. Ungrateful gits! pic.twitter.com/OrFpiEipY3
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) September 7, 2022
अफगाणिस्तानने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना प्रत्त्युतरात उरतलेल्या पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार बाबर आझम भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर धावा काढताना फखर झमान बाद झाला. टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी गेलेला मोहम्मद रिझवानही २० धावा करून स्वत:त माघारी गेला. त्यानंतर इफ्तिखार अहमदने ३० (३३), शादाब खान ३६ (२६), मोहम्मद नवाझ ४ (५), खुशदील शाह १ (३), हरिस रौफ ० (१) धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. तेव्हा गोलंदाज नसीम शाहने सलग दोन षटकार खेचत पाकिस्तानचा विजय सोयीस्कर केला. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक या दोघांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर, रशीद खानने दोन बळी टिपले.
दरम्यान, रोमहर्षक विजयाने पाकिस्तानने आशिया चषक २०२२ च्या अंतिम फेरीत स्थान पक्के केलं आहे. तर, अफगाणिस्तान आणि भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.