पुणे : १६ वर्षीय भारतीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने इटलीतील रोम येथे झालेल्या ग्रीको-रोमन अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ३२ वर्षांनंतर अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
पप्पू यादवने १९९० आणि १९९२ मध्ये अनुक्रमे अंडर-१७ आणि U२० गटात सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, विनोद कुमारने १९८० मध्ये ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये U-१७ गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता सूरजने ३२ वर्षानंतर अंडर-१७ गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे ने ट्विट करत म्हटले आहे.
सुरजने युरोपियन चॅम्पियन फरीम मुस्तफेववर ११-० असा मोठा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात करत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच त्यांनी ३-० अशी आघाडी घेतली.
१९९० मध्ये पप्पू यादव चॅम्पियन झाला तेव्हा भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. पप्पू यादव 1990 मध्ये चॅम्पियन झाल्यानंतर आणखी पाच भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले, परंतु कोणालाही सुवर्णपदक मिळू शकले नाही. इतिहास रचल्यानंतर सूरज म्हणाला, मला माझ्या वजन प्रकारात जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू व्हायचे आहे. सीनियर वर्ल्ड जेतेपद हे माझे स्वप्न आहे.