India vs South Africa: कोलकाता: भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने अजिंक्य राहण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. सलग आठ विजयांसह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. आता भारत अव्वल स्थानावरच राहणार हेही निश्चित झाले आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, हा संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे, मात्र हा पराभव दक्षिण आफ्रिकेच्या मनोधैर्य खचण्यासाठी करणी भूत ठरू शकतो.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 101 धावा केल्या. त्याने वनडेमधले 49 वे शतक झळकावत सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. श्रेयस अय्यरने 77 आणि कर्णधार रोहितने 40 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्कराम वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 83 धावा करू शकला. मार्को जॅन्सनने सर्वाधिक 14 धावा केल्या. त्याच्याशिवाय डुसेनने 13 आणि बावुमा-मिलरने 11-11 धावा केल्या. त्यांच्याशिवाय आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी मिळवले. मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.