पुणे प्राईम न्यूज: विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज सामना आहे. हा सामना विशेषत: अफगाणिस्तानचे गोलंदाज विरुद्ध भारतीय फलंदाजांवर केंद्रित असेल. कारण अफगाणिस्तानची ताकद गोलंदाजी आहे आणि टीम इंडियाची फलंदाजी खूप मजबूत आहे.
अफगाणिस्तानकडे भारतीय संघासारखेच फिरकी आक्रमण आहे. या संघात राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद नबी आणि मुजीब सारखे फिरकीपटू आहेत. दुसरीकडे भारतीय फलंदाजी क्रमवारीत 1 ते 7 क्रमांकापर्यंत सामना जिंकणारे फलंदाज आहेत. या सामन्यामध्ये पाच खेळाडू आहेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. चला जाणून घेऊयात ते पाच खेळाडू कोण आहेत?
1. राशिद खान: अफगाणिस्तानचा विजय किंवा पराभव हे आज राशिद खान कशी कामगिरी करतो यावर अवलंबून असेल. राशिद खानला भारतात आणि भारतीय फलंदाजांविरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव आहे. कसलेली गोलंदाजी करण्यात पारंगत असण्यासोबतच त्याला आवश्यक वेळी विकेट्स कसे काढायचे हे देखील माहीत आहे. त्याच्याकडे स्फोटक फलंदाजीद्वारे खालच्या क्रमवारीतही सामने जिंकण्याची क्षमता आहे. या सामन्यात तो आयपीएलप्रमाणे यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.
2. फजलहक फारुकी: 2022 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत फजलहकने पॉवरप्लेमध्ये 19 विकेट घेतल्या आहेत. या काळात पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा डाव्या हाताचा कोन भारतीय टॉप ऑर्डरसाठी अडचणीचा ठरू शकतो.
3. रहमानुल्ला गुरबाज: अफगाणिस्तानला फलंदाजीत रहमानुल्ला गुरबाजकडून सर्वाधिक आशा असतील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 अफगाणिस्तानच्या फलंदाजांमध्ये तो सर्वात जलद 1000 धावा करणारा ठरला आहे. त्याने अवघ्या 27 डावांत हा आकडा गाठला.
4. रोहित शर्मा: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या सामन्यात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी तो या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडू शकतो. विश्वचषकापूर्वीच रोहित त्याच्या स्फोटक फॉर्ममध्ये परतला आहे. त्यानंतर आजचा सामना दिल्लीच्या सपाट खेळपट्टीवर खेळवला जाईल. गेल्या सामन्यात येथे खूप धावा झाल्या. रोहित शर्माला अशा प्रकारच्या खेळपट्ट्या खूप आवडतात.
5. विराट कोहली: किंग कोहली असा खेळाडू आहे, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. सध्या तोही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात त्याचे शतक अगदी थोडक्यात हुकले होते. आजच्या सामन्यात त्याला कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. परिस्थितीनुसार कसे खेळायचे हे त्याला माहीत आहे. दबावाच्या परिस्थितीत, कोणतीही जोखीम न घेता एकेरी दुहेरीच्या मदतीने टीम इंडियासाठी सामना जिंकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.