Sports News : नवी दिल्ली : देशात ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक होणार असून, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषवण्याची शक्यता आहे. Sports News
देशात ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार……….
भारत विकसनशील देशांच्या श्रेणीत असून, जगातील सर्व विकसित देशांनी केवळ क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. म्हणजेच त्यांनी आपापल्या देशातील खेळांना जेवढे प्राधान्य दिले आहे तेवढेच प्राधान्य इतर बाबींना दिले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये 2008 ची स्पर्धा सर्वोत्तम मानली गेली आहे. हे आयोजन चीनमधील बीजिंग येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याबरोबरच चीनने या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम केला होता. Sports News
आज चीन जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असून, जगाला आपल्या सामर्थ्याची खात्री पटवून दिली आहे. याशिवाय अमेरिका, रशिया, फ्रान्स, इटली, जपान, ब्रिटन आणि जर्मनी या विकसित देशांतील खेळाडूंनीही ऑलिम्पिकमध्ये भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आज भारताकडे साधनसामुग्रीची कमतरता नाही. पण ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्णपदक मिळवण्यासाठी आपण प्रतीक्षा करीत असतो. Sports News
देश गुलामगिरीत असताना भारताने 1928 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते. इतकेच नाही, तेव्हापासून ते 1956 पर्यंत भारत हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवत राहिला. भारताला आतापर्यंत मिळालेल्या एकूण 10 सुवर्ण पदकांपैकी 8 पदके हॉकीमध्ये मिळाली आहेत.